Marathi Mhani | 1100+ सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह
‘म्हणी’ म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेचदा बोलताना सहज मराठी म्हणींचा उपयोग करत असतो. काळाच्या ओघात मराठी म्हणी मात्र आजही त्यांचं महत्त्व राखून आहेत. ते त्यांच्या सहज आणि उत्तम अर्थामुळे. मोठे मोठ लेखक असोत वा एखादा साधी काम करणारी मोलकरीण बोलण्याच्या ओघात ते म्हणींचा Marathi Proverb उपयोग करतात. म्हणी या जरी छोट्या असल्या तरी त्यांचे अर्थ मात्र फारच खोल आणि अगदी वर्मावर बोट ठेवणारे असतात. मराठी भाषेतील आगळ्या-वेगळ्या आणि आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक सर्वोत्तम मराठी म्हणींचा संग्रह Marathi Mhani फक्त आपल्यासाठी.
Marathi Mhani
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
शहाण्याला शब्दाचा मार.
शितावरून भाताची परीक्षा.
शिर सलामत तर पगड़ी पचास.
शिराळ शेती दाट.
शुभ बोल नाय तर म्हणे मांडवाला आग लागली.
शेरास सव्वाशेर.
शिळ्या कढीला ऊत.
शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?
शोधा म्हणजे सापडेल.
‘श्री’ आला की ‘ग’ सुध्दा येतो.
संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
श्रीमंता घरच्या कुत्र्याला पण ‘आहो हाडा’ म्हणावे लागते.
सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
सगळं मुसळ केरात.
सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
सतरा पुरभय्ये अन अठरा चुली.
अंधारात केले पण उजेडात आले.
अकिती आणि सणाची निचिती.
अक्कल खाती जमा.
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
अंधेर नगरी चौपट राजा.
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
अडली गाय खाते काय.
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झालं अन हसू आलं.
अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती तिथं माती.
अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
अती परीचयात आवज्ञा.
अती राग भीक माग.
अपयश हे मरणाहून वोखटे.
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
अपापाचा माल गपापा.
अपुऱ्या घड्याला डबडब फार.
अप्पा मारी गप्पा.
अर्थी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
अल्प बुध्दी, बह गर्वी.
अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
मराठी म्हणी संग्रह
अळी मिळी गुपचिळी.
अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
राहायला नाही घर म्हणे लग्न कर.
सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये.
वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा.
खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन.
मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क.
चुकली मुलं सायबरकॅफेत.
चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये.
ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार.
नाजुक मानेला मोबाईलचा आधार.
मनोरंजन नको रिंगटोन आवर.
स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा.
जागा लहान फ़र्निचर महान.
उचलला मोबाईल लावला कानाला.
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार.
काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं.
म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
म्हसोबाला नव्हती बायको अन सटवीला नव्हता नवरा.
म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
याची देहा, याची डोळा.
याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
रंग गोरापान आणि घरात ग घान.
रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
राईचा पर्वत.
राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला.
राजा तशी प्रजा.
रात्र थोडी अन सोंग फार.
राजा बोले अन दल चाले.
राजाला दिवाळी काय ठाऊक?
रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
मराठी म्हणींचा संग्रह
रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
रोज मरे त्याला कोण रडे.
लंकेत सोन्याच्या विटा.
लकडी शिवाय मकडी वळत नाही.
लग्न बघावे करून अन घर पहावे बांधून.
लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
लहान तोंडी मोठा घास.
लांड्यामागे पुंडा.
लाखाचे बारा हजार.
मराठी म्हणी संग्रह व अर्थ
लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
लेकी बोले सुने लागे.
लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
वड्याचे तेल वांग्यावर.
वर झगझग आत भगभग.
वर मुकुट आणि खाली नागडं.
वराती मागून घोडे.
वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
वरून कीर्तन आतून तमाशा.
वळचळीचे पाणी आइयाला कसे चढेल.
वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत.
(असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
वळवाचा पाऊस.
वळू ऊठला पण संशय फिटला.
वाचेल तो वाचेल.
वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
वाटाण्याच्या अक्षता.
वासरात लंगडी गाय शहाणी.
वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
विंचवाचे बि-हाड पाठीवर.
विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
विषाची परीक्षा.
विहीणाचा पापड वाकडा.
वेळना वखत आन गाढव चाललय भुकत.
वेळेला केळं अन वनवासाला सिताफळं.
वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
वैरी गेला अन जागा पैस झाला.
शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ
असतील चाळ तर फिटतील काळ.
असतील मुली तर पेटतील चुली.
शहाणं होईना अन सांगता येईना.
असतील शिते तर जमतील भूते.
असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
असून अडचण नसून खोळांबा.
असेल दाम तर होईल काम.
असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
आंधळीपेक्षा तिरळी बरी.
आई भाकर देत नाही अन बाप भिक मागू देत नाही.
आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैरी झाले.
आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
आईचा काळ, बायकोचा मवाळ.
Marathi Proverbs
आईची माया अन पोर जाईला वाया.
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी.
आग लागल्यावर विहीर खणणे.
आगीशिवाय धूर दिसत नाही.
आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
आज अंबारी, उद्या झोळी धरी.
आजा मेला, नातू झाला.
आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
आडजीभ खाई अन पडजीभ बोंबलत जाई.
आडात नाही तर पोह्यात कोठून?
आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
आधणातले रडतात, सुपातले हसतात.
आधी करा मग भरा.
आधी करावे मग सांगावे.
आपण आरे म्हटले की कारे आलेच
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
आधी नमस्कार मग चमत्कार.
आपण आपल्याच सावलीला भितो.
आधी पोटोबा, मग विठोबा.
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या,
त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हंगायच.
आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
आपण सुखी तर जग सुखी.
आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
आपलंच घर, हागुन भर.
आपला आळी, कुत्रा बाळी.
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो काया.
आय नाय त्याला काय नाय.
आपला हात, जग्गन्नाथ.
आपलाच बोल, आपलाच ढोल.
आपली ठेवायची झाकून अन दुसऱ्याची पहायची वाकून.
आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
आपलेच दांत अन आपलेच ओठ.
आपल्या कानी सात बाळ्या.
आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही
पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
आयत्या बिळात नागोबा.
Marathi Mhani with Meaning
आपल्या ताटातले गाढव दिसत नाही
पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
आराम हराम आहे.
आरोग्य हीच धनसंपत्ती.
आलथा पसा, पालथा पसा,
माकडा तुझा संसार कसा?
आला भेटीला धरला वेठीला.
आली अंगावर, घेतली शिंगावर.
आली चाळीशी, करा एकादशी.
आळश्या उळला अन शिंकरा शिंकला.
आली सर तर गंगेत भर.
आलीया भोगासी असावे सादर.
आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
आळश्याला दुप्पट काम.
आळी ना वळी सोनाराची आळी.
आळश्याला गंगा दूर.
आवडतीचा शेंबुड गोड आणि
नावडतीचे मीठ आळणी.
आवडीने केला वर त्याला
दिवसा खोकला रात्री ज्वर.
आवळा देवून भोपळा काढणे.
(आवळा देवून कोहळा काढणे.)
आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
आशा सुटेना अन देव भेटेना.
आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
इकडून तिकडून सगळे सारखे.
इकडे आड तिकडे विहीर.
इच्छा तसे फळ.
इच्छिलेले जर घडले असते
तर भिक्षुकांते राजे होते.
इजा बिजा तीजा.
ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
उंट पाण्यात बुडालाय नि शेळी
म्हणतीय मी येऊ काय?
उंटावरचा शहाणा.
उंदराला मांजराची साक्ष.
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
उघड्याकडे नागडा गेला
अनं रात्रभर हिवाने मेला.
उचलली जीभ लावली टाळ्याला.
उठता लाथ, बसता बुक्की.
उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
उधार तेल खवट.
उधार पाधार वाण्याचा आधार.
उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
उन पाण्याचे घर जळत नसते.
उपट सुळ, घे खांद्यावर.
उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
उसना पसारा देवाचा आसरा.
उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
उसाच्या पोटी कापूस.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
मराठी म्हणी व वाक्प्रचार
एक कोल्हा सतरा ठिकाणी प्याला.
एक गांव बारा भानगडी.
म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.
एक गोरी आणि हजार खोड्या चोरी.
एक घाव दोन तुकडे.
याची देहा, याची डोळा.
एक तीळ सात जणांनी वाटून खावा.
म्हसोबाला नव्हती बायको अन सटवीला नव्हता नवरा.
एक ना धड बाराभर चिंद्या.
म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?.
येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
रंग गोरापान आणि घरात गु घान.
रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!.
येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
राईचा पर्वत.
राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला.
राजा तशी प्रजा.
रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
राजा बोले अन दल चाले.
राजाला दिवाळी काय ठाऊक?.
रात्र थोडी अन सोंग फार.
रिकामा नावी कुडाला तुंबे लावी
( रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी ).
मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी,
पाहिलं तर फाटकीच फडकी.
रुखवत आले,
रुखवत आले दणाणली आळी,
पहातात तो अर्धीच पोळी.
रोज घालतयं शिव्या अन
एकादशीला गातयं ओव्या.
रोज मरे त्याला कोण रडे.
लंकेत सोन्याच्या विटा.
लकडी शिवाय मकडी वळत नाही.
लग्न बघावे करून अन घर पहावे बांधून.
लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
लवकर उठे,
लवकर निजे त्यास आरोग्य,
संपत्ती लाभे.
लहान तोंडी मोठा घास.
लांड्यामागे पुंडा.
लाखाचे बारा हजार.
लाखाशिवाय बात नाही अन
वडापाव शिवाय काही खात नाही.
लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
लेक नाही तोवर लेवून घ्यावे
सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
लेकी बोले सुने लागे.
लेकीच लेकरं उडती पाखरं,
लेकाची लेकरं चिकट भोकरं.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
लोकाचे लेणे ले ग लुचरे,
मागायला आली दे ग कुत्रे.
वड्याचे तेल वांग्यावर.
Marathi Mhani List
वर झगझग आत भगभग.
वर मुकुट आणि खाली नागडं.
वराती मागून घोडे.
वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
वरून कीर्तन आतून तमाशा.
वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत
(असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
वळवाचा पाऊस.
वळू ऊठला पण संशय फिटला.
वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
वाचेल तो वाचेल.
वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
वाटाण्याच्या अक्षता.
वासरात लंगडी गाय शहाणी.
वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
विंचवाचे बि-हाड पाठीवर.
विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
विषाची परीक्षा.
विहीणाचा पापड वाकडा.
वेळना वखत आन गाढव चाललय भुकत.
वेळेला केळं अन वनवासाला सिताफळं.
वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
वैरी गेला अन जागा पैस झाला.
शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
शहाणं होईना अन सांगता येईना.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
शहाण्याला शब्दाचा मार.
शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
शितावरून भाताची परीक्षा.
शिर सलामत तर पगड़ी पचास.
शिराळ शेती दाट.
शिळ्या कढीला ऊत.
शुभ बोल नाय तर म्हणे मांडवाला आग लागली.
शेरास सव्वाशेर.
शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?.
शोधा म्हणजे सापडेल.
‘श्री’ आला की ‘ग’ सुध्दा येतो.
श्रीमंता घरच्या कुत्र्याला पण ‘आहो हाडा’ म्हणावे लागते.
संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
सख्ख्या सासूला दिली लाथ,
चुलत सासूचा कापला कान,
तिथे मामे-सासू मागते मान.
सगळं मुसळ केरात.
सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
सतरा पुरभय्ये अन अठरा चुली.
नाचता येईना म्हणे अंगण वाकडे,
स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे.
नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण.
नारो शंकराची घंटा.
नाव्याचा उकरंडा कितीही उकरला
तरी केसच निघणार.
नालासाठी घोडं.
नाही चिरा, नाही पणती.
नाही निर्मल मन काय करील साबण.
निर्लज्याच्या गांडीवर घातला
पाला गार लागला अजून घाला.
मराठी म्हणी pdf
नेमेचि येतो मग पावसाळा.
नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
पंचमुखी परमेश्वर.
पंत मेले, राव चढले.
पडतील स्वाती तर पिकतील मोती.
पडत्या फळाची आज्ञा.
पडलो तरी नाक वर.
पडू आजारी, मौज वाटे भारी.
पत्रावळी आधी दोणा, तो जावई शहाणा.
पदरी पडले आणि पवित्र झाले.
परदुःख शितल असते.
पळत भुई थोडी.
पहिला दिवशी पाहणा, दुसऱ्या दिवशी पयी,
तिसऱ्या दिवशी थारी अक्कल आधी गयी.
पहिले पाठे पंच्चावन्न.
पाचावर धारण बसली.
पाटलाचं घोडं महाराला भुषण.
पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.
पाण्यात म्हैस वर मोल.
पाण्यात राहन माशाशी वैर?.
पाण्यावाचून मासा झोपा घेई केसा,
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
पादऱ्याला पावटाचे निमित्त.
पादा पण नांदा.
पानामागून आली अन तिखट झाली
(अगसली ती मागासली,
मागाहून आली ती गरोदर राहीली ).
पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?.
पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम.
पायाखालची वाळू सरकली.
पारध्याची गोड गाणी हरिणीसाठी जीव घेणी.
पारावरला मुंजा.
पालथ्या घडावर पाणी
( पालथ्या घागरीवर पाणी ).
पिंपळाला पाने चार.
पिकतं तिथे विकत नाही.
पितळ उघडे पडले.
पी हळद अन हो गोरी.
पुढच्याच ठेच मागचा शहाणा.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लौकी झेंडा.
पुराणातील वानगी पुराणात.
पुरुषांचे मरण शेती,
बायकाचे मरण वेती (प्रसुती).
पेरावे तसे उगवते.
पैशाकडेच पैसा जातो.
पोकळ वाशांचा आवाज मोठा.
पोट भरे खोटे चाले.
पोटात नाही दाणा म्हणे रामकृष्ण म्हणा.
प्रयत्नांती परमेश्वर.
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.
फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू,
काही लागेल देणं तर नाही बा येणं.
फुकटचंबू बाबूराव.
फुकटचे खाणे आणि हागवणीला कहर.
फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?.
बड़ा घर पोकळ वासा.
बळी तो कान पिळी.
बाईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.
बाईल गेलीया अन झोपा केला.
बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
बाज बघुन बाळंतीण व्हावे.
Marathi Mhani Funny
बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.
बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
बायको नाही घरी धोपाटणे उड्या मारी.
बारा गावच्या बारा बाभळी.
बारा घरचा मुंजा उपाशी.
बुडत्याचे पाय खोलात.
बारा झाली लुगडी तरी भागुबाई उघडी
( बारा लुगडी तरी बाई उघडी ).
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
बुडत्याला काडीचा आधार.
बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.
बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड
तो म्हणतो मला सावली झाली.
बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या.
बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात
पण न बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात.
बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
बोलाचीच कढी अन बोलाचाच भात.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?.
भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
भरवश्याच्या म्हशीला टोणगा.
भले भले गेले गोते खात,
झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?.
भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत.
भातापेक्षा वरण जास्त.
भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.
भिंतीला कान असतात.
भिक नको पण कुत्रा आवर.
भितीवर डोकं आपटून काही होत नाही
उलट स्वतःलाच खोक पडते.
भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
भुकेच्या तापे करवंदीची कापे.
भुकेपेक्षा ब्रम बरा.
भुकेला केळं, उपासाला सिताफळ.
भुरक्यावाचून जेवण नाही
आणि मुरक्यावाचून बाई नाही.
भुकेला कोंडा अन निजेला धोंडा.
भुकेला पिकलं काय? अन हिरवं काय?.
भोळी ग बाई भोळी,
लुगड्यावर मागते चोळी,
खायला मागते पुरणपोळी.
मऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा.
मनी चिंती ते वैरीही न चिंती.
a मनी नाही भाव देवा मला पाव.
मनी वसे ते स्वप्नी दिसे.
मरावे परी किर्तिरुपे उरावे.
मला नं तुला, घाल कुत्र्याला.
मला पहा अन फुले वहा.
महादेवापुढे नंदी असायचाच.
मांजर डोळे मिटून दुध पिते पण ते जगाला दिसतचं.
माकड म्हणतं माझीच लाल.
Mhani in Marathi
माकडाच्या हातात कोलीथ.
माझा लोक तुझ्या घरी अन तुपानं तोंड भरी.
माझा ह्यां असा,
बायकोचा तो तसा,
गणपतीचा होऊचा कसा?.
माणूस पाहून शब्द टाकावा,
अन जागा पाहून घाव मारावा.
मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच.
मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी
आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.
माय मरो पण मावशी उरो.
मारा पण तारा.
मिंया बिबी, तेगार भिंतीला उभी.
मिया मुठभर, दाढी हातभर.
मी नाही त्यातली अन कडी लावा आतली.
s मी बाई संतीण माझ्या मागे दोन तीन.
मी हसते लोकांना अनं शेबूड माझा नाकाला.
मुंगी व्यायली, शीगी झाली,
दुध तिचे किती, बारा रांजण भरून गेले,
सतरा हत्ती पिउन गेले.
मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते
पण हत्ती मुंगीच्या नाही.
मुंगेच्या मुताला महापूर.
मुग गिळून गप्प बसावे.
मुर्ती लहान पण किर्ती महान.
मुळांपोटी केरसुनी.
मेलेलं कोंबडं आगीला भित नाही.
मेल्या म्हशीला शेरभर दुध.
मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
मोडेन पण वाकणार नाही.
मोह सुटेना अन देव भेटेना.
म्हननाऱ्यानं म्हण केली,
अन जाननाराले अक्कल आली.
डोळे आणि कान यांच्यात
चार बोटाचे अंतर असते.
डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
ढवळ्याशेजारी बांधला पावळया,
वाण नाही पण गुण लागला.
ढुंगणाखाली आरी अन चांभार पोरं मारी.
ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.
ढोंग धतोरा, हाती कटोरा.
ढोरात ढोर, पोरात पोर.
त वरून ताकभात.
तण खाई धन.
तरण्या झाल्या बरण्या आणि
म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
तरण्याला लागली कळ,
म्हाताऱ्याला आलयं बळ.
तळहाताने चंद्र झाकत नाही.
तळे राखी तो पाणी चाखी.
तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
तहान लागल्यावर आड खणणे.
ताकापुरते रामायण.
ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
तागास तूर लागू न देणे.
ताटाखालचं मांजर.
ताटात सांडलं काय नि
वाटीत सांडलं काय एकच.
तारेवरची कसरत.
तीन तिघडा काम बिघाडा.
तु दळ माझे,
मी दळीण गावच्या पाटलाचे.
तुकाराम बुवांची मेख.
तुझं अन माझं जमेना
तुझ्यावाचुन करमेना.
तुम्ही करा अन आम्ही निस्तरा.
Mhani in Marathi with Meaning
तुरात दान, महापुण्य.
तुला नं मला, घाल कुत्र्याला.
तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी,
पण वेळ मिळेले त्या दिवशी.
तेरड्याचे रंग तीन दिवस.
तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
तेलणीवर रुसली अंधारात बसली.
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
तोंडात तीळ भिजत नाही.
तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
त्यात काही राम नाही.
थांबला तो संपला.
थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
थेंबे थेंबे तळे साचे.
थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.
थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
दगडापेक्षा विट मऊ.
दमडीची नाही मिळकत
आणि घडीची नाही फुरसत.
दहा गेले पाच उरले.
दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
दही वाळत घालून भांडण.
दांत आहे तर चणे नाहीत,
चणे आहेत तर दांत नाहीत.
दांत कोरून पोट भरतो.
दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
दानवाच्या घरी रावण देव.
दाम करी काम.
दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा
आणि मोरीला बोळा घालायचा.
दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
दिवस गेला रेटारेटी,
चांदण्यात बसली कापूस वेचीत.
दिवस बुडाला मजूर उडाला.
दिवसा चुल रात्री मूल.
दिवाळी दसरा हात पाय पसरा.
दिव्याखाली नेहमीच अंधार.
दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
दुःख रेड्याला न डाग पखालीला.
दुखणे हत्तीच्या पायाने येते
आणि मुंगीच्या पायाने जाते.
दुध पोळलं की ताक कुंकून प्यावे.
दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
दुभत्या गाईच्या लाथा गोड.
दुरून डोंगर साजरे.
दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
दुष्काळात तेरावा महिना.
दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
दृष्टी आड सृष्टी.
दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!.
दे माय धरणी ठाय ( हे माय, धरणी ठाय ).
देखल्या देवा दंडवत.
देण कुसळाच, करणं मुसळाच.
देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
देणाऱ्याचे हात हजार.
देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
मराठी म्हणींचा संग्रह
देणे ना घेणे रिकामे गाणे.
देव तारी त्याला कोण मारी.
देव भावाचा भुकेला.
देश तसा वेश.
देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
देवाचं नावं अन स्वताच गावं.
देवाची करणी आणि नारळात पाणी.
देह देवळात चित्त पायतणात.
दैव देतं अन कर्म नेतं.
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
दोघींचा दादला उपाशी.
दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
द्या दान सुटे गिरान ( ग्रहण ).
धनगराच्या मेंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
धनवंताला दंडवत.
धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा
( धन्याला कन्या अनं चोराला मलिदा ).
धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.
धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
धाक ना दरारा, फुटका नगारा.
धावत्यापाठी यश.
धावल्याने धन मिळत नाही.
धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे
( वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये ).
धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.
धुतल्या तांदळातला खडा.
न कर्त्याचा वार शनिवार.
न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?.
नमनाला घडाभर तेल.
नरो वा कुंजारोवा.
नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
नवरा नाही घरी सासरा जांच करी.
नवऱ्याने मारले पावसाने झोडपले
तक्रार कुणाकडे न्यायची.
नव्याची नवलाई.
नसुन खोळंबा असुन दाटी.
नांदणाऱ्याला पळ म्हणायचे
आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
नव्याचे नऊ दिवस.
नांव गंगुबाई अन तडफडे तहानेने
( नांव गंगाबाई, __रांजनात पाणी नाही ).
नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
ना घरचा ना घाटचा.
नांव मोठे लक्षण खोटे.
नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
नांव सगुणी करणी अवगुणी.
नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन,
पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?.
List of Marathi Mhani
नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
नाक दाबले की तोंड उघडते.
नाकपेक्षा मोती जड.
नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा.
नाकावर पदर अन विशीवर नजर.
सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
सळो की पळो केले.
साखरेचे खाणार द्याला देव देणार.
साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.
सात सुगरणी, भाजी अळणी.
साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
साता समुद्राकडे राजाने लावला भात,
ऐक ऐक शीत नऊ नऊ हात.
साधली तर शिकार नाही तर भिकार.
साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला,
ती म्हणते माझ्यासारखीच हो!.
साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.
सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
सासू न सासरा जांच करे तिसरा.
सासू नाही घरी, नणंद जाच करी.
साप मुंगसाचे वैर.
सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
साठी बुध्दी नाठी.
सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
सुंठेवाचून खोकला गेला.
सुईण आहे, तो पर्यंत बाळंत होऊन घ्यावे.
सुख राई एवढे दुःख पर्वता एवढे.
सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.
सुतावरून स्वर्ग गाठायचा.
सुसरबाई, तुझी पाठ मऊ.
सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.
सोन्याहून पिवळे.
स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
स्वतःची सावली विकून खाणारी माणसं.
स्वभावाला औषध नाही.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
हगत्या लाज की बघत्या लाज?.
हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
हजीर तो वजीर.
हत्ती गेला अन शेपुट राहिले.
हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत.
हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
हसणाऱ्याचे दांत दिसतात.
हा सुर्य अन हा जयद्रथ.
हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.
हात दाखवून अवलक्षण.
हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
हातचं (गणित) ठेवून वागावे.
हातचे सोडून पळत्याच्या मागे.
हातच्या काकणाला आरसा कशाला?.
हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात.
हातात कवडी विद्या दवडी.
Marathi Mhani on Body Parts
हातानं होईना काही तोंड घेतं घाई.
हाती घ्याल ते तडीस न्या.
हिंग गेला, वास राहीला.
हाती नाही अडका, बाजारात धडका.
हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा.
ही काळ्या दगडावरची रेघ.
हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश.
होता जिवा म्हणून वाचला शिवा.
हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.
“ग” ची बाधा झाली.
अंगापेक्षा बोंगा जास्ती.
एक पंथ दोन काज.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.
एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
अंधळं दळतं अन कुत्र पिठ खातं.
एक पुत्री रडते, सात पुत्री रडते आणि निपुत्री पण रडते.
एक मांसा अन खंडीभर रस्सा.
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
एक वेळ जेवायचे ताट द्यावे पण पाट देवू नये.
एकटा जिव सदाशिव.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही.
एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे.
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी.
एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
एका हाताने टाळी वाजत नाही.
एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी बिडी.
एकादशी अनं दुप्पट खाशी.
एकादशीच्या घरी शिवरात्र.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
ऐंक रे भैया, आंब्याच्या कैऱ्या.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
ऐंट राजाची अन वागणूक कैकाड्याची.
ऐंशी तिथे पंच्याऐंशी करडे पुरणपोळ्या.
ऐतखाऊ गोसावी, टाळ भैरव बैरागी.
ओ म्हणता ठो येईना.
ओठात एक आणि पोटात एक.
ओठी ते पोटी.
ओल्या बरोबर सुके जळते.
ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
ओसाड गावी एरंडी बळी.
औटघटकेचे राज्य.
औषधावाचून खोकला गेला.
औषधावाचून खोकला गेला.
कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
कच्च्या गुरुचा चेला.
Marathi Mhani on Animals
कठीण समय येता कोण कामास येतो.
कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
कण्हती कुथती, मलियाला उठती.
कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
कपिलाषष्टीचा योग.
कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला.
कर नाही त्याला डर कशाला?.
करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?.
करणी कसायची, बोलणी मालभावची.
करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
करवंदीच्या जाळीला काटे.
करायला गेलो एक अन झाले एक.
करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
करावे तसे भरावे.
करीन ती पूर्व.
करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले.
करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
करू गेले काय? अन उलटे झाले काय?.
कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड.
कळते पण वळत नाही.
कशात काय अन फाटक्यात पाय.
कशात ना मशात, माकड तमाशात.
कष्ट करणार त्याला देव देणार.
का ग बाई उभी, घरात दोघी तिघी.
काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?.
काखेत कळसा अन गावाला वळसा.
काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
काट्याचा नायटा होतो.
काट्याने काटा काढायचा.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
काडी चोर तो माडी चोर.
कानात बुगडी, गावात फुगडी.
काप गेले आणि भोके राहिली.
काप गेले नि भोका रवली.
काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
काम न धंदा, हरी गोविंदा.
काय बाई अशी तु शिकवले तशी.
काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
काम नाही घरी सांडून भरी.
कामापुरता मामा अन ताकापुरती आजी.
काय करु अन कस करु?.
काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
कावळा बसायला आणि फांदी तुटायला.
कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे).
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
Marathi Proverbs on hard work
काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.
कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?.
कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तहानी.
कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
कुणाचा कुणाला पायपूस नाही.
कुठे तरी पाल चुकचुकतेय.
कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
कुडास कान ठेवी ध्यान.
कुडी तशी पुडी.
कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.
कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.
कुत्र्या मांजराचे वैर.
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
कु-हाडीचा दांडा, गोतास काळ.
कुसंतनापेक्षा निसंतान बरे.
केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.
केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
केळीवर नारळी अन घर चंदमोळी.
केळ्याचा डोंगर, देई पैशाचा डोंगर.
केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
कोंड्याचा मांडा करुन खाणे.
कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं ( कोणाला कशाचे मळणीला लसणाचे ).
कोल्हा काकडीला राजी.
कोल्ह्यास द्राक्षे आंबट.
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे.
खतास महाखत.
खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
खऱ्याला मरण नाही.
खाई त्याला खवखवे.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
खाऊ जाणे तो पचवू जाणे.
खाऊन माजावे पण टाकून माजू नये.
खाजवुन अवधान आणणे.
खाजवून खरुज काढणे.
खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी.
खाण तशी माती.
खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही.
खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले.
खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत.
खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ.
खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.
खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.
खायला कहर आणि भुईला भार.
खाली मुंडी, पाताळ धुंडी.
खायला कोंडा अन निजायला धोंडा.
खायला बैल, कामाला सैल (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त).
खालल्या घरचे वासे मोजणारा.
50 Marathi Proverbs
खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
खिशात नाही आणा अन म्हणे मला बाजीराव म्हणा.
खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा.
खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली.
खोट्याच्या कपाळी गोटा.
गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
गंगेत घोडं न्हालं.
गरज सरो अन वैद्य मरो.
गरजवंताला अक्कल नसते.
गरजेल तो पडेल काय?.
गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं.
गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.
गळ्यातले तुटले ओटीत पडले.
गवयाचे मुल सुरांनीच रडणार.
गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
गाठ पडली ठकाठका.
गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो.
गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने ( घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं ).
गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.
गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ.
गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.
गाढवाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी.
गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.
गाढवाला गुळाची चवं काय?.
गाता गळा.
गाव करी ते राव न करी.
गाव करील ते राव करील काय?.
शिपता मळा.
गाव तिथे उकिरडा.
गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.
गावात घर नाही रानात शेत नाही.
गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
गुप्तदान महापुण्य.
गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
गुरुची विद्या, गुरुलाच फळली.
गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे.
गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?.
गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य.
गुळाला मुंगळे चिकटतातच.
गोगल गाय पोटात पाय.
गोड बोलून गळा कापणे.
गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.
गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
गोष्ट लहान, सांगण महान.
गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.
गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.
घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.
घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.
घर ना दार चावडी बि-हाड ( घर ना दार वाऱ्यावर बिन्हाड ).
घर फिरले की वासेही फिरतात.
Proverbs with Marathi meaning
घरचा उंबरठा दारालाच माहीत.
घर साकड नि बाईल भाकड.
घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
घरचे झाले थोडे अन व्याहीने धाडले घोडे.
घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.
घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
घराची कळा अंगण सांगते.
घरात घरघर चर्चा गावभर.
घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.
घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.
घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.
घरात नाही कौल, रिकामा डौल.
घरासारखा गुण, सासू तशी सून.
घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.
घरोघरी मातीच्या चुली.
घाण्याचा बैल.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.
घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
घे सुरी आणि घाल उरी.
घोंगड अडकलं.
घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
घोडामैदान जवळ असणे.
घोडे खाई भाडे.
घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
चढेल तो पडेल.
चने खाईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.
चमडी जाईल पण दमडी जाणार नाही.
चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
चांदणे चोराला, उन घुबडाला.
चांभाराची नजर जोड्यावर.
चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.
चार आण्याची कोंबडी अन बाराण्याचा मसाला.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
चारजनांनी केली शेती, मोत्या ऐवजी पिकली माती.
चालत्या गाडीला खीळ घालणे.
चिंती परा ते येई घरा.
चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
चिपट्यात काय काय करू?.
चुकलेला फकीर मशिदीत.
चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.
चोर तो चोर वर शिरजोर.
चोर नाही तर चोराची लंगोटी.
जनात बुवा आणि मनात कावा.
चोर सोडून संन्याशाला सुळी.
चोराच्या उलट्या बोंबा.
चोराच्या मनांत चांदणं.
जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.
जमता दशमा ग्रह.
10 Proverbs in Marathi
चोराला सुटका, आणि गावाला फटका.
चोरावर मोर.
चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.
चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.
छडी लागे छमछम विद्या येई घमघम.
जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
जगाच्या कल्याणा संताची विभुती.
जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
जलात राहून माशाशी वैर कशाला?.
जळतं घर भाड्याने कोण घेणार?.
जशास तसे.
जशी कामना तशी भावना.
a जशी देणावळ तशी धुणावळ.
जशी नियत तशी बरकत.
जसा गुरु तसा चेला.
जसा भाव तसा देव.
जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
जातीसाठी खावी माती.
जात्यातले रडतात, सुपातले हसतात.
जात्यावर बसले की ओवी सुचते.
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
जाळाशिवाय नाही कढ अन माये शिवाय नाही रड.
जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?.
जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
जावयाचं पोर हरामखोर.
जावा जावा आणि उभा दावा.
जावा जावा हेवा देवा.
जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
जिकडे सुई तिकडे दोरा.
जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.
जिथे कमी तिथे आम्ही.
जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
जुनं ते सोनं नवं ते हवं.
जे न देखे रवि ते देखे कवि.
जे पिंडी ते ब्रम्हांडी.
जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
जो गुण बाळा तो जन्म काळा.
जो नाक धरी, तो पाद करी.
ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका.
जो श्रमी त्याला काय कमी.
जोकून खाणार, कुंथुन हागणार.
ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
जोवरी पैसा तोवरी बैसा.
ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.
Proverb Meaning in Marathi
ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
ज्याची दळ त्याचे बळ.
ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
ज्याच्या हाती ससा तो पारधी.
ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?.
झगा मगा माझ्याकडे बघा.
झाकली मुठ सव्वालाखाची.
झाड जावो पण हाड न जावो.
झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया.
झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.
झारीतले शुक्राचार्य.
झालं गेलं गंगेला मिळालं.
झोपून हागणार, उठून बघणार.
टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
टिटवेदेखील समुद्र आटविते.
ठकास महाठक.
ठण ठण पाळ मदन गोपाळ.
ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
ठेवले अनंते तैसेची रहावे.
ठोसास ठोसा.
डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
डोंगर पोखरून उंदीर काढणे.
डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
हे हि वाचा : Marathi Suvichar
आपल्याला जर हा मराठी म्हणींचा संग्रह Marathi Mhani आवडला असल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. आम्हाला Facebook, Pinterest व Instagram वर जरूर फॉलो करा.
Sanjay Jangam is a Chief Content Producer with HeloPlus. He covers Technology, Business, entertainment & Personal finance stories.